Sunday, January 19, 2020

तुका म्हणे - उत्तरे 


प्रश्न:

  तुकोबांच्या अभंगांत शेवटच्या ओळीत शिकवणूक, तात्पर्य किंवा मर्म असते. उदा 

गाथा: १२७७ लाहानपण दे गा देवा 
लाहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । तया अंकुशाचा मार ॥ध्रु.॥
ज्याचे अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥२॥
तुका म्हणे जाण । व्हावें लाहनाहुनि लाहन ॥३॥

पुढे दहा लोकप्रिय (गायक / संगीतकारांची कृपा) अभंगांची शेवटची शिकवण दिली आहे. बघूया किती पटापट अभंग आठवतो !
1 तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥
2 तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
3 तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
4 तुका म्हणे गर्भवासीं । सुखें घालावें आम्हासी ॥३॥
5 बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥
6 तुका म्हणे आम्हां जोगें । विठ्ठल घोगें खरें माप ॥३॥
7 तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥५॥
8 तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥५॥
9 तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥३॥
10 तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥४॥


उत्तरे :

१. गाथा 3241, आनंदाचे डोहीं आनंदतरंग  

आनंदाचे डोहीं आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचें ॥१॥
काय सांगों जालें कांहीचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥ध्रु.॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥२॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥
---


२. गाथा 2,  सुंदर तें ध्यान उभे विटेवरी

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
---



---

3. गाथा ३.  सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

सुरेश वाडकर: 


---

४. गाथा 2296,  हें चि दान देगा देवा

हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईंन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥
न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥२॥
तुका म्हणे गर्भवासीं । सुखें घालावें आम्हासी ॥३॥

श्रीधर भोसले: 

(भैरवी):  

---

५. गाथा 9, हाचि नेम आतां न फिरें माघारी

 हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥
घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥
बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥

लता: 

कौशिकी:
---


६. गाथा 3734, आतां कोठें धांवे मन

आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंदु ॥ध्रु.॥
प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥२॥
तुका म्हणे आम्हां जोगें । विठ्ठल घोगें खरें माप ॥३॥

भीमसेन: 

संजीव अभ्यंकर: 

---

७. गाथा 2471, वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें 

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥२॥
कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवश्वरु ॥३॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥४॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥५॥

लता: 

नवीन तुकाराम चित्रपट: 

---

८. गाथा 189, खेळ मांडियेला वाळवंटीं घाई

खेळ मांडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥
नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी । कळिकाळावरि घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥ध्रु.॥
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां । टाळ मृदंग घाई पुष्पवरुषाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥
लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सद्धिसाधकां रे ॥३॥
वर्णाभिमान विसरली याति । एकएकां लोटांगणीं जाती । निर्मळ चित्तें जालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥४॥
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥५॥

लता: 

भाडिपा: 

---

९: गाथा 533, कमोदिनी काय जाणे तो परिमळ

कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥
तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्ही च तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥
माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥२॥
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥३॥

लता: 

---

१०. गाथा 2811, भेटीलागीं जीवा लागलीसे आस

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्र चकोराचें जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥
दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥२॥
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥३॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥४॥

लता: 

---

अजून कोणते अभंग सहज आठवतात ? आणि कोणती तुका म्हणे _______ __ __ ________ आठवतात ?

0 Comments:

Post a Comment

<< Home