प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे |
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे ||
सशाला दिसे विपिन फिरता शृंगही जरी |
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ||
जी.ए. कुलकर्णी यांच्या "माणसे: अरभाट आणि चिल्लर" ह्या आत्मवृत्तात ह्या रचनेबद्दल हा वेगळा उतारा वाचनात आला आणि प्रकर्षानी आठवण झाली ..
एकदा सडेकर मास्तरांनी निबंधाला विषय दिला : "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..." रात्री उशीरापर्यंत जागून मी निबंध लिहिला. प्रयत्न केला तर सारे काही साध्य होते, प्रयत्न हाच परमेश्वर; 'उद्योगाच्या घरी ऋद्धी सिद्धी पाणी भरी'... इत्यादी, औषधाच्या बाटलीबरोबर माहितीचा कागद असतो, त्याप्रमाणे या विषयाबाबतचे हे नेहमीचे भरण अगदी मराठी चौथीपासून आमच्या जवळ तयार असे. त्याच विषयावर आम्ही यापूर्वी दोनदा लिहिले देखील होते. परंतु या खेपेला माझे मनच उफराटे झाले होते की काय कुणास ठाऊक, या खेपेला मी एक वेगळाच निबंध लिहिला : "प्रयत्ने वाळूचे कण-" या ओळीचा अर्थ प्रयत्नाने सारे काही साध्य होते, असा मुळीच नाही. माणूस जन्मभर जरी रगडत बसला तरी वाळूच्या कणांवर थेंबभर देखील तेल गळणार नाही. या ठिकाणी कवी पूर्णपणे अशक्य अशा गोष्टींची उदाहरणे देत आहे. मृगजळाने तहानलेल्या माणसाची (एखाद्या वेळी) तहान भागेल, रानात सशाचे शिंग सापडू शकेल, वाळूच्या कणांतून तेलाचा थेंब गळू शकेल, पण मूर्खाचे हृदय मात्र कधीही धरता येणार नाही. म्हणून ही ओळ प्रयत्नांची स्तुती करणारी मुळीच नाही. कुणी तरी असला खुळचट अर्थ डोक्यात घेतला व त्याची परंपरा होऊन बसली. एखाद्या पुजाऱ्याला पूजा करताना शिंक यावी व ते पाहून पूजेच्या सुरुवातीला शिंकलेच पाहिजे असा क्रम निर्माण व्हावा, तसे या ओळीबद्दल झाले आहे." ...
मनोगतावरून साभार ..
16 Comments:
हा खरा अर्थ कधी कुणी सांगितलाच नव्हता. आम्ही आपले वाळू रगडत आणि तेल गळायची वाट पहात इतके दिवस बसलो होतो.
अरेच्या !
ऑ?
आणि इतरही खूप उद्गारवाचक चिन्ह टाकावी लागतील.....
खरोखरच ह्या ओळी अशा अर्थाने होत्या आणि रूढ झालेला अर्थ म्हणजे फेकमफाक आहे, हे समाजालच नाही कधी!
ह्या ओळी कुठच्या आहेत ?
Dhnyavad Saheb...!
Kharokharach upyukta mahiti ahe.
Correct
Correct
This comment has been removed by the author.
सशाचेही लाभे विपिनि फिरता
याच आशयाचे एक पत्र लोकसत्तेत खूप पूर्वी वाचल्याचे आढळते आपणही सुयोग्य अर्थनिर्णयन करून एक प्रचलित झालेला अपसमज दुरुस्त केला आहे...
खरेच माहित नव्हते
imagination is everything. mr.author you can imagine in your own way others can imagine in theirs own way both are right perspectives in theirs own unique perspectives if you want to prove yourself right then you don't need to prove others wrong others will do theirs things and you will do yours
Yacha shabad shaha urth ghetla tr valutun jivanbhar tel nighnar nhi pan prayatn tr kela pahije jya ghosti shakya hotil tyasathi nhitr jaminitn panihi milnar nhi
Yacha shabad shaha urth ghetla tr valutun jivanbhar tel nighnar nhi pan prayatn tr kela pahije jya ghosti shakya hotil tyasathi nhitr jaminitn panihi milnar nhi
प्रयत्ने मूर्खाचे ह्रदय धरवे नाकळे
——-
——
परंतु वाळूचे कण रगडिता तेल नाही गळे
श्रीराम...... रामचरितमानस.. तुलसीरामायणात ऐक दोहा आहे... बारि मथें घृत होइ बरु सिकता ते बरु तेल।
बिनु हरि भजन न तव तरिअ यह सिद्धांत अपेल॥122 क॥ उत्तरकांड.. अर्थात.... पाणी घुसळल्याने कदाचित तूप उत्पन्न होईल, वाळू रगडून तेल निघेल पण श्री हरी च्या भजनाशिवाय संसाररुपी सागरातून तरुन जाता येणार नाही हा आटळ सिध्दांत आहे..... जय जय रघुवीर समर्थ
शेवटच्या ओळीत परंतु हा शब्द आला आहे. त्यामुळे रूढ अर्थ बरोबर आहे.
This comment has been removed by the author.
Post a Comment
<< Home