कुसुमाग्रजांच्या दोन कविता - झाड आणि मौन
पहिली कविता "मुक्तायन" कवितासंग्रहाच्या दुसर्या पानावर आहे, आणि दुसरी
चाळिसाव्या पानावर. दोन्ही तश्या वेगळ्या आहेत, पण तरी दोघींमधे एक विशेष
दुवा मला जाणवतो.
झाड
तूच पाऊस
तूच ऊन
मी फक्त एक झाड
आकाशात चिणलेलं
तुझं पाऊसपण
तुझं ऊनपण
तुझं वादळपण
अंगावर घेता घेता
शिणलेलं.
मौन
शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.
शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.
शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.
शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.
शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.
ह्या कवितेतला "शिणलेला" हा शब्द नजरेआड केला तर ही कविता मला जास्ती आवडेल कदाचित .
3 Comments:
"झाड" वाचल्याची आठवता नाही! दोन्ही कविता अर्थातच उत्कृष्ट! नोंदत रहा!
उत्कृष्ट!
शिणलेला हा शब्द मला वाटत की, कवीची कविता करतेवेळी असलेली मनाची स्थिती दर्शविते.
Post a Comment
<< Home