Saturday, October 14, 2006

केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला ...

दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या,
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||धृ.||

वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी,
प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी ,
हादरली धरणि व्योम शेषही शहारला ||१||

खान चालला पुढे, अफाट सैन्य मागुती,
उंट, हत्ती, पालख्याही रांग लांब लांब ती !
टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला ||२||

तुळजापुरची भवानी माय महान मंगला,
राउळात आदमखान दैत्यासह पोचला,
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला ||3||

श्रवणी तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले,
रक्त तापले करात खडग सिध्द जाहले,
देउनी बळी अदास तोशवी भवानीला ||४||

सावधान हो शिवा !! वैर्याची रात्र ही !!
काळ येतसे समीप, साध तूच वेळ ही,
मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ||५||

केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला









अफझलखान अफाट फौजफाटा घेउन जेंव्हा स्वराज्यावर चालुन आला त्या प्रसंगावर आधारित हे महान पद्य.

जेवढे आठवले आणि मिळाले तेवढे लिहीले आहे,
जर कुणाला अजून कडवी माहीत असतिल तर कृपया सांगा !

3 Comments:

At 10:51 PM, Blogger Abhijit Bathe said...

दुसऱ्या कडव्यात - उंट हत्ती पालख्याही रांग लांब लांब ती
चौथ्या कडव्यात - श्रवणी तप्त तैलसे शिवास वृत्त पोचले.

बाकी प्रयत्न कौतुकास्पद.

 
At 6:28 AM, Blogger veerendra said...

वा .. खरच !! मला जी मदत करता येइल हा blog वाढवण्यासाठी ती मी नक्की करेन !

 
At 1:01 AM, Blogger शिरीष गानू said...

चौथ्या कडव्यात,
रक्त तापले "करात" खड्ग सिद्ध जाहले॥

 

Post a Comment

<< Home