Sunday, March 04, 2007

निष्पर्ण तरूंची राई


भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया
त्या वेली नाजुक भोळ्या वार्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणु अंगी राघवशेला



देऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरला सुरला थेंब
संध्येतिल कमळफुलासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत राने
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरूंची राई

-ग्रेस

5 Comments:

At 10:41 PM, Blogger शिरीष गानू said...

हे गाणं, मी परत परत ऐकतो व वाचतो. परत परत त्यातील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळी नवीन नवीन अनुभूती येते. Nostalgic होतो पण रडू येत नाही...

 
At 3:59 AM, Blogger Pjadhaw said...

ग्रेस म्हणजे हवहवंस वाटणारं रहस्य !

 
At 12:17 AM, Blogger Såçhîñ Jâdhãv (Såçh) said...

This comment has been removed by the author.

 
At 12:23 AM, Blogger Såçhîñ Jâdhãv (Såçh) said...

किती गुढ आहे यात किती वेळा प्रयत्न करावा समजण्यासाठी एक वेगळाच अनुभव येतो मी ह्या कवितेच्या प्रेमात पडलो आहे!

 
At 10:39 AM, Blogger Unknown said...

कवी ग्रेस हे आकर्षक करणारे रसायन आहे,हे ते कोडे आहे जे कधीच उलगडत नाही,प्रयत्न केला तरी प्रत्येक वेळी वेगवेगळे भाव निर्माण करते...भूतकाळात मन रमत,पण ठाव लागत नाही...

 

Post a Comment

<< Home