Monday, June 12, 2006

रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्

रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् |
भास्वान् उद्देष्यति हसिष्यति पञ्कजश्रीः ||
इत्थं विचिन्त्य कोषगते द्विरेके |
हा हन्त हन्त नलिनीम् गजउज्जहार ||

रात्रीच्या वेळी कमलपुष्पे आपापल्या पाकळ्या मिटुन घेतात, जणु झोपूनच जातात आणि सूर्योदयाबरोबर नव्या दिवसाच्या स्वागताला पुन्हा उमलतात ह्या नित्य घटनेवर आधारीत ही एक सुंदर कवीकल्पना आहे.

संध्याकाळी उशिरा कमळातील मकरंद पिण्यास फुलामधे उतरलेला एक भ्रमर (भुंगा) रात्र होताच पाकळ्या बंद झाल्यामुळे आतच अडकुन पडलेला आहे, थोड्याच वेळात सकाळ होइल आणि पाकळ्या उमलून मी परत स्वतंत्र होइन असा विचार करून जणु हसतोय, पण अरेरे, इथे कविच्या मनात नियतीच्या मनात काही वेगळेच आणायचे आहे, ती कमळाची वेलंच हत्तीनी उपटून टाकली.

"हा हन्त हन्त" हा वाक्प्रचार बहुतेक याच सुभाषितावरून आला असावा.

शाळेत असताना संस्कृतच्या कुठल्याशा तासाला शिकलेले हे सुभाषित का कोण जाणे (बहुतेक शेवटच्या चरणातील कलाटणीमुळे) पण अजुन लक्षात आहे.

0 Comments:

Post a Comment

<< Home